महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shinde Group Vs Thackeray Group : कोल्हापूरात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा; कारण काय वाचा सविस्तर

शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. याचे पडसाद कोल्हापुरातील स्थानिक राजकारणात उमटले आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल ( Molestation Case Against Thackeray Group Activists ) करण्यात आला आहे. ( In Kolhapur Shinde Group Filed A Molestation Case Against Thackeray Group Activists )

Molestation Case Against Thackeray Group Activists
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा

By

Published : Sep 16, 2022, 3:17 PM IST

कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात ( Molestation Case Against Thackeray Group Activists ) आला आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ( Ganesh Visarjan Procession Kolhapur ) शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे नेते क्षीरसागर यांच्या स्टेज समोर घोषणाबाजी केली होती. त्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती. त्यानंतर आता थेट रविकिरण इंगवले यांच्यासह 40 जणांवर जुना राजवाडा पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( In Kolhapur Shinde Group Filed A Molestation Case Against Thackeray Group Activists )




मिरवणुकीत घडला 'हा' संपूर्ण प्रकार : दरम्यान, कोल्हापूरात चार दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक ( Ganesh Visarjan Procession Kolhapur ) पार पडली. यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद ( Dispute between Shinde and Thackeray group ) सुद्धा पाहायला मिळाला. यामिरवणुकीत नेहमीप्रमाणे प्रत्येक पक्षाकडून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होते. शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचे सुद्धा याठिकाणी स्टेज होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले ( Shiv Sena city chief Ravikiran Ingwale ) आणि त्यांच्या मंडळाची सुद्धा मिरवणूक या ठिकाणी पोहोचली. तेंव्हा इंगवले यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडे पाहात गद्दारीच्या घोषणा दिल्या. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यांनंतर याची सर्वत्र चर्चाही झाली. मात्र आता हा वाद आता विकोपाला गेला आहे की शिंदे गटाकडून इंगवले यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये म्हंटल्याप्रमाणे क्षीरसागर यांच्या स्टेज वर अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांना लज्जा उत्पन्न होईल अशा घोषणा दिल्या. त्यामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूरात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा

घोषणाबाजी करत शिवसेनेच्या गाण्यावर ठेका - विसर्जन मिरवणुकीत इंगवले अध्यक्ष असलेल्या शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम तरुण मंडळाची मिरवणूक क्षीरसागर यांच्या मंडपसमोर आली असता, इंगवले यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांनी 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावही निर्माण झाला होता. यावेळी स्टेजवर शिंदे गटातील महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दहशत माजवण्याच्या उद्देशाने आणि महिला पदाधिकारी स्टेजवर उपस्थितीत असल्याचे पाहून लज्जा उत्पन्न होईल, अशी आक्षेपार्ह भाषा वापरत हातवारे आणि शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details