महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Pawar : 'पैसा, पदांची ऑफर देत जिल्ह्या जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचे प्रयत्न'

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदीही विराजमान झालं. आता शिंदे गटाकडून जिल्ह्या जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचे काम सुरु आहे, असा आरोप संजय पवारांनी केला ( sanjay pawar allegation shinde group ) आहे.

eknath shinde sanjay pawar
eknath shinde sanjay pawar

By

Published : Jul 23, 2022, 3:29 PM IST

कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आता जिल्ह्या जिल्ह्यातील कार्यकारणी फोडण्याचे प्रयत्न सुरू ( shinde group break shivsena in maharashtra ) झाले आहेत. कोल्हापूरातील अनेक शिवसैनिकांना पैशाचे तसेच पदांची ऑफर दिली जात आहे, असा गौप्यस्फोट कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शिवाय कोकणातील शिंदे गटातील काही आमदार आणि व्यक्तींकडून हे फोन केले जात आहे. मात्र, आमचे शिवसैनिक एकनिष्ठ आहेत. ते कोणत्याही ऑफरला बळी पडणार नाही, असेही पवार यांनी म्हटलं ( sanjay pawar allegation shinde group ) आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, समन्वयक हर्षल सुर्वे उपस्थित होते.

संजय पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'सरकार कोसळणार म्हणून...' -संजय पवार म्हणाले, एवढे सत्तानाट्य घडल्यानंतर सुद्धा शिंदे गटातील कोकणातील आमदार व त्यांचे काही एजंट कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना काही आमिषे दाखवून आपल्याकडे खेचण्याचा केविलोणा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न कधीही सफल होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. आपले सरकार कोसळणार म्हणूनच ते आता शिवसैनिक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक एजंट निष्ठावंत शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी अशा एजंट पासून शिवसेनेकांनी सावध रहाणे गरजेचे आहे. शिवसेना व शिवसेनेचा धनुष्यबाण हा कायमस्वरूपी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे अशा भूलथापांना व आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सुद्धा यावेळी संजय पवार यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सक्रिय -विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ४० आमदारांना एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये नेत बंड केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली. राज्यातील मविआ सरकारचे संख्याबळ घटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खेचत, भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदेंनी शिवसेनेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामावून घेत, सेनेचे बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व निर्माण करत आहेत. बारा आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने धनुष्यबाण चिन्हासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. मात्र, चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ द्यायचा नाही, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कंबर कसली आहे. त्यामुळे सेनेतील गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत.

हेही वाचा -Chandrakant patil on Eknath shinde : एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले - भाजप नेते चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details