महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खालावलेली वैचारिक पातळी सुधारण्यासाठी ही पोटनिवडणूक लढणार - राजेश नाईक - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक राजेश नाईक

कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, कोल्हापुरातील पुरातन मालमत्ता संरक्षण यासह उद्योजकांना येत असलेल्या अडचणी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राजेश नाईक ( Kolhapur north by election Rajesh Naik ) यांनी सांगितले.

shetkari sanghatna candidate Rajesh Naik
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक राजेश नाईक

By

Published : Mar 29, 2022, 9:12 AM IST

कोल्हापूर -कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून, कोल्हापुरातील पुरातन मालमत्ता संरक्षण यासह उद्योजकांना येत असलेल्या अडचणी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राजेश नाईक ( Kolhapur north by election Rajesh Naik ) यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक लढवण्यासाठी निधी हा सर्वसामान्य जनतेमधून उभा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेकडून उद्योजक राजेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक चिन्ह मिळताच आता प्रचाराची रणनिती आखण्यासाठी संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर नाईक यांनी पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली.

माहिती देताना उमेदवार राजेश नाईक

हेही वाचा -Chandrakant Patil Criticized Shiv Sena : 'राष्ट्रवादीच महाविकास आघाडी सरकार चालवत आहे'

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून, अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस गेला असून, सर्व उमेदवारांना प्रचार चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीत रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेकडून उद्योजक राजेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किटली हे प्रचार चिन्ह मिळाले असल्याचे राजेश नाईक यांनी सांगितले आहे.

चिन्ह वाटप होताच उमेदवार लागले प्रचाराच्या तयारीला :कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 जण निवडणूक लढवणार असून रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनेही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला आहे. प्रचार चिन्ह मिळताच शेतकरी संघटनेने आजपासून प्रचार शुभारंभ करणार असल्याचे अधिकृत उमेदवार राजेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापूरचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न जसे हेरिटेज, टुरिझम, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, शेती, तसेच उद्योग करताना येणाऱ्या अडचणी यांना समोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच, इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर आणि गेल्या काही दिवसांत खालावलेली वैचारिक पातळी सुधारण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे राजेश नाईक यांनी सांगितले.

अशी आहे कोल्हापूर उत्तर मतदारांची आकडेवारी: उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 583 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 656 हे पुरुष मतदार, तर 1 लाख 45 हजार 915 स्त्री मतदार आहेत. तसेच, 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 11 हजार 275 मतदार आहेत. तर, सैन्य दलातील मतदारांची संख्या ही 95 इतकी आहे.

हेही वाचा -Sarathi Agitation : कोल्हापूरच्या सारथी उपकेंद्रावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details