महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 5, 2019, 12:03 PM IST

ETV Bharat / city

केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक; सर्वधर्मीयांचा सन्मान गरजेचा - शरद पवार

शुक्रवारी मुंबईमध्ये झालेल्या युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. ते कोल्हापुरात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कोल्हापूर - शुक्रवारी मुंबईमध्ये झालेल्या युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हिंदुत्वाच्या मुद्यावरच भर दिला गेला. देशात सर्वधर्मीयांचा सन्मान गरजेचा असताना केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी आज कोल्हापुरात आघाडीच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

हेही वाचा -अभी तो मै जवान हुँ... शरद पवारांची कोल्हापुरात शेरेबाजी!

बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आघाडीच्या उमेदवारांचीही त्यांनी स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पण उमेदवारी न मिळालेल्या घटकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारच्या धोरणावर टीका केली. पत्रकार परिषदेत राज्याच्या हिताचा विचार त्यांनी केला नसल्याचीही टीका केली.

हेही वाचा -नाराज जनतेसाठी सत्ताधारी निवडणुकीच्यावेळी भावनिक मुद्दे काढतात - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details