कोल्हापूरKolhapur Ambabai Temple: तिरूमला देवस्थानकडून Tirumala Temple कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे या शालुचे पूजन करून, तो अंबाबाईला अर्पण केला आहे. तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा हा शालू देवीला अर्पण करण्यात आला आहे. यावेळी तिरुमल्ला देवस्थान तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यंदाही रितीरिवाजाप्रमाणे अंबाबाईला शालूतिरूमला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालु सुपूर्त करण्यात आला. आज सकाळी 12 वाजण्याच्या दरम्यान देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, यांच्यासह तिरुमल्ला देवस्थानचे मिलिंद नार्वेकर, सौरभ वोरा तसेच अन्य पदाधिकारी, सदस्य अंबाबाईला शालू घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. यावेळी रितीरिवाजाप्रमाणे देशभरातील अनेक देवस्थानकडून शालू साडी पाठवण्याची प्रथा आहे. तीच प्रथा आम्ही कायम ठेवल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तिरुपतीहून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू पारंपरिक रितिरिवाजाप्रमाणे शालूचे स्वागतपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे दरवर्षी तिरूमला देवस्थानकडून मोठ्या मानाने अंबाबाईसाठी शालू पाठवला जात आहे. दरवर्षी शालू घेऊन आलेल्या तिरूमल्ला देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच शालूचे पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे वाजत गाजत स्वागत करण्यात येते. या वर्षीही त्यांचे देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आले आहे. शिवाय देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सन्मान करण्यात आला आहे
लवकरच प्रति तिरुपती बालाजी मंदिर मुंबईमध्ये बनणारदरम्यान यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी लवकरच मुंबईमध्ये तिरुपती बालाजी प्रमाणेच मुंबई मध्येही मंदिर बनणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी भव्य जागा मिळाली. लवकर पायाभरणीचा मुहूर्त पाहून कामाला सुरुवात करणार आहे. शिवाय काम सुरू झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षांत अगदी हुबेहूब तिरुपती प्रमाणेच मुंबईमध्ये बालाजी मंदिर बनणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.