कोल्हापूर : हजारो वर्षांपासून आपल्या ऑक्सिजन देत असलेल्या झाडांच्या ज्या 'चेन सॉ कटर'मुळे बळी ( Chain saw cutters kill trees ) जातो. त्या चेन सॉ कटरवर शासनाने बंदी घातली ( Ban that Chain Saw Cutter ) पाहिजे, त्यावर नियंत्रण असले पाहिजे, अशी मागणी अभिनेते तसेच वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी ( Actor and tree lover Sayaji Shinde ) केली आहे. ज्या पद्धतीने पिस्तूल तसेच अनेक हत्यारे बेकायदेशीरपणे ठेवल्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागते. कारण त्यामुळे एखाद्याचा खून होऊ शकतो त्याच पद्धतीने 'चेन सॉ कटर' मुळेसुद्धा अनेक झाडांचा बळी जाऊ शकतो. म्हणूनच यावर बंदी घातली पाहिजे त्यावर नियंत्रण असले पाहिजे, असेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. ( Chain Saw Cutter Should be Banned )
झाडांचा बळी घेणाऱ्या 'चेन सॉ कटर'वर बंदी घातली पाहिजे : अभिनेते सयाजी शिंदे यांची मागणी
अभिनेते सयाजी शिंदे ( Actor and tree lover Sayaji Shinde )कोल्हापुरात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, वृक्षतोड करणाऱ्या "चेन साॅ कटर"वर बंदी ( Ban That Chain Saw Cutter ) घालण्याची मागणी केलेली आहे. या चेन साॅ कटरने अनेक झाडांचा बळी ( Chain saw cutters kill trees ) घेतला आहे. ज्याप्रमाणे पिस्तूल इत्यादी हत्यारे बेकायदेशीर आहेत. तसेच, या चेन साॅ कटरबाबत निर्णय घेतला पाहिजे. ( Chain Saw Cutter Should be Banned )
अभिनेते सयाजी शिंदे
'चेन सॉ कटर' यमाची भूमिका पार पाडतात :यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, 'चेन सॉ कटर'च्या बेकायदेशीर वापरामुळे अनेक झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण असले पाहिजे. हे कटर मशीन यमाचीच भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे यावर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे. शिवाय यावर बंदी घातली घालून, ठोस इलाज व्हावा असेही त्यांनी म्हटले.
Last Updated : Jul 17, 2022, 10:09 AM IST