महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Satej Patil On Jayprabha Studio : जयप्रभा स्टुडिओबाबत सतेज पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, जागा पुन्हा ताब्यात घेण्याबाबत... - जयप्रभा स्टुडिओ सतेज पाटील प्रतिक्रिया

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ विकल्याचा प्रकार अलिकडे समोर ( Kolhapur Jayprabha Studio Sale ) आला होता. त्यावर जागा पुन्हा ताब्यात घेण्याबाबत लेखी प्रस्ताव प्राप्त झाल्यावर बैठक लावून निर्णय घेऊ, असे सतेज पाटील यांनी म्हटलं ( Satej Patil On Jayprabha Studio ) आहे.

satej patil
satej patil

By

Published : Feb 16, 2022, 1:17 PM IST

कोल्हापूर - काय झाले कसे झाले याच्या खोलात जाण्यापेक्षा यापुढे काय करता येईल याबाबत प्रयत्न करणे अभिप्रेत आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयप्रभा स्टुडिओसंदर्भात मांडले आहे. सध्या स्टुडिओ विकत घेतलेल्या मालकाकडून जागा पुन्हा ताब्यात घेण्याबाबत लेखी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर बैठक लावून निर्णय घेऊ. तोपर्यंत पुढे काय करायचे हे सांगता येणार नाही, असे पाटील यांनी ( Satej Patil On Jayprabha Studio ) सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोल्हापूरवासीयांचा विरोध असताना एका नेत्याच्या मुलाने जागा विकत घेतली, असे विचारले असता पाटील म्हणाले की, 'व्यवसाय करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणात्यातरी नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याने व्यवसाय करू नये हे योग्य नाही. मात्र, त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा राजकीय वाद न करता यातून मार्ग कसा काढता येईल, याबाबत प्रयत्न करण्याची गरज असून त्यादृष्टीने पुढे जाऊ.'

'शिवाय वाद न वाढवता पुन्हा एकदा जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून लता मंगेशकर यांची स्मृती कशी जपता येतील, यादृष्टीने माझे प्रयत्न असतील. शासनस्तरावर विक्री झालेल्या स्टुडिओची किंमत ठरवून ती पुन्हा ताब्यात घेता येते का हे सुद्ध पाहू,' असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड होते. जी जागा हेरिटेज वास्तू मध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा -Washim Accident : उभ्या ट्रॅक्टरला भरधाव व्हॅनची भीषण धडक, 4 जण जागीच ठार, 10 जण गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details