कोल्हापूर -भाजप नेत्या चित्रा वाघ ( Stone Pelting On Chitra Wagh ) यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही प्रि-प्लॅन आणि स्टेज मॅनेज घटना होती, असं गृहराज्य मंत्री सतेज पाटील ( Satej Patil Reaction On Chitra Wagh Alligation ) यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेचा पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घ्यावे, असे आदेशही गृहराज्य मंत्री सतेज पाटील ( Chitra Wagh Stone Pelting Case Enquiry Order ) यांनी दिले आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
Stone Pelting On Chitra Wagh : 'चित्रा वाघ यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही प्रि-प्लॅन आणि स्टेज मॅनेज' - सतेज पाटील चित्रा वाघ सभा दगडफेक वक्तव्य
भाजप नेत्या चित्रा वाघ ( Stone Pelting On Chitra Wagh ) यांच्या सभेमध्ये झालेली दगडफेक ही प्रि-प्लॅन आणि स्टेज मॅनेज घटना होती, असं गृहराज्य मंत्री सतेज पाटील ( Satej Patil Reaction On Chitra Wagh Alligation ) यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले सतेज पाटील -कोल्हापुरात प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अधिक बंदोबस्त द्यावा किंबहुना माझा बंदोबस्त काढून त्यांना दिला, तरी काही हरकत नाही, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले. तसेच दगडफेक करणारे लोक कदमवाडीतील होते की, पंपावरील होते, हेही लवकरच सिद्ध होईल. मात्र, आपली चूक दुरुस्त करण्यासाठी चित्रा वाघ या कोल्हापूरला बदनाम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा -judicial custody of Malik extends : मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ