कोल्हापूर : संजय मंडलिक आता शिंदे गटात आले आहेत, त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात त्यांच्याशी अनेक ठिकाणी आघाडी होऊ शकेल. शिवाय तशी चर्चा झाली तर निश्चितच आम्ही त्यामध्ये इच्छुक आहोत असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ते कोल्हापुरात माध्यमांसोबत बोलत होते. शिवाय मंडलिक यांनी शिंदे गटात येण्यापूर्वी माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे मात्र आपण सांगणार नसल्याचे महाडिक यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर कोल्हापुरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
शिंदे, फडणवीस अन् माझ्याशी सुद्धा चर्चा :यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, राज्यातील सत्तांतर होत असताना मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र त्यांनी काय चर्चा केली हे विचारू नका असेही महाडिक म्हणाले.