महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Mumbai Airlines : कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू, संजय घोडावत यांनी केली 'ही' अपेक्षा व्यक्त

Kolhapur Mumbai Airlines: कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport अतिशय वेगाने प्रगती करत आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. इथून लवकरच देशभरातील मेट्रो सिटींना जोडण्याचा आमच्या स्टार एअरचा प्रयत्न असणार आहे. आजपासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा Kolhapur Mumbai Airlines सुरू झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा International Airlines सुद्धा सुरू करण्यावर आमचा भर असणार आहे.

Kolhapur Mumbai Airlines
Kolhapur Mumbai Airlines

By

Published : Oct 4, 2022, 3:53 PM IST

कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport अतिशय वेगाने प्रगती करत आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. इथून लवकरच देशभरातील मेट्रो सिटींना जोडण्याचा आमच्या स्टार एअरचा प्रयत्न असणार आहे. आजपासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा Kolhapur Mumbai Airlines सुरू झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा International Airlines सुद्धा सुरू करण्यावर आमचा भर असणार आहे. त्यासाठी अजून दीड वर्षांचा अवधी लागेल, अशी माहिती स्वतः संजय घोडावत यांनी 'ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. शिवाय सध्या मोठी विमाने उतरण्यासाठी रनवे अजूनही 600 मीटर कमी पडतो. तो सुद्धा होण्याबाबत आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे घोडावत यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू

यांनी लावली उपस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरू व्हावी. यासाठी प्रयत्न केले जात होते. ती विमानसेवा अखेर आजपासून सुरुवात झाली. 'स्टार एअर' कंपनीची विमानसेवा आजपासून सुरुवात झाली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, यांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली.

अशी असेल विमानसेवा स्टार एयरची विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. ही विमानसेवा आठवड्यातील केवळ 3 दिवस असणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस ही विमानसेवा असणार आहे. मुंबईवरून सकाळी 10:30 वाजता विमान उड्डाण करेल, तर 11:20 म्हणजेच केवळ 40 ते 50 मिनिटांत हे विमान कोल्हापूरात पोहोचणार आहे. तेच विमान सकाळी 11:50 वाजता कोल्हापूरातून उड्डाण करेल आणि मुंबईमध्ये दुपारी 12:45 वाजता पोहोचेल. ही विमानसेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरू असणार असून याचे तिकीट दर 2 हजार 500 पासून पुढे असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details