कोल्हापूर - यावर्षी सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचा जीव पहिला महत्वाचा आहे. केवळ 20 लोकांना गडावर जाण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी गडावर जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करेन, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढिल दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन, असेही खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या दिशेसंदर्भात स्पष्ट केले आहे.
राज्याभिषेक सोहळा घरातूनच साजरा करा; मी ठरल्याप्रमाणे राजसदरेवरून पुढील दिशा घोषित करेन - संभाजीराजे
सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याची माझी जबाबदारी आहे असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरूनच घोषित करेल असेही संभाजीराजे यांनी म्हटले.
खासदार संभाजीराजे