महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत जिल्हा रुग्णालयाची पाहणी; शिवजयंतीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या बालकांना विशेष शुभेच्छा - कोल्हापूर संभाजी ब्रिगेड शिवजयंती साजरी

संभाजी ब्रिगेडच्यावतीने कोल्हापुरात (Sambhaji Brigade Kolhapur) आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या बालकांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची वेशभूषा साकारत आज सीपीआर रुग्णालयात संभाजी ब्रिगेडने अनोखी शिवजयंती साजरी केली.

kolhapur shivjayanti
कोल्हापुरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी

By

Published : Feb 19, 2022, 7:36 PM IST

कोल्हापूर - संभाजी ब्रिगेडच्यावतीने कोल्हापुरात (Sambhaji Brigade Kolhapur) आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या बालकांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची वेशभूषा साकारत आज सीपीआर रुग्णालयात संभाजी ब्रिगेडने अनोखी शिवजयंती साजरी केली. यावेळी नवजात शिशु विभागात भेट देत जन्मलेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या, तर त्यांच्या मातांना शिवबाप्रमाणे त्यांना घडवण्याचे आवाहन केले.

कोल्हापुरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी
  • रुग्णालयाची केली पहाणी :

दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. जिजाऊ, संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सर्वांनी शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिवरायांच्या कार्याचा जयघोष करीत सर्वजण सीपीआरमध्ये पोहोचले. यावेळी डॉक्टर गिरीश कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णांना कोणकोणत्या तक्रारी आहेत याची माहिती घेतली. शिवाय रुग्ण व नातेवाईकांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले.

सीपीआर रुग्णालयात शिवजयंती साजरी
  • नुकत्याच जन्मलेल्या बालकाचे नाव ठेवले 'जिजाऊ' :
    सीपीआर रुग्णालयात शिवजयंती साजरी

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवमय वातावरणात रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णांनी देखील प्रतिसाद देत समस्या व्यक्त केल्या. शिवाय नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे यावेळी जिजाऊ नाव ठेवा असे सुचवण्यात आले. दरम्यान, या उपक्रमाचे सर्वच लोकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, निलेश सुतार, भगवान कोईगडे, अभिजीत भोसले, संदीप यादव, मारुती भोळे, आसिफ स्वार, शहाबाद शेख, शैलेश हिर्डेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या चारुशीला पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details