महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 20, 2021, 10:35 PM IST

ETV Bharat / city

समरजित घाटगेंची सीपीआर रुग्णालयास भेट

समरजित घाटगेंनी सिपीआर रुग्णालयाला भेट दिली. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगेंनी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सध्या संपूर्ण देश सामना करत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आणि आरोग्य सेवेबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अ. धो. माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, बंटी सावंत आदी उपस्थित होते.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरात रुग्णवाढीची परिस्थिती नियंत्रणात -

जिल्हा शक्य चिकित्सक माळी म्हणाले, की महाराष्ट्रभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा जवळपास तिप्पट गतीने रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्यातुलनेत कोल्हापूरमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये पाचव्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत 46 टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेऊन त्यादृष्टीने पूर्वतयारी केली असल्याचेही डॉ. माळी यांनी सांगितले.

शाहू ग्रुपमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करू -

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, की येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सुद्धा घाटगे यांनी केले. शाहू ग्रुपमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करू. शाहू साखर कारखान्यामार्फत चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यकत्या सर्व सुविधा पुरवण्याची ग्वाहीसुद्धा यावेळी घाटगे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details