कोल्हापूर - लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ येथे सर्व शाहू प्रेमीनी एकत्र येत अभिवादन केले. तसेच शहरात सकाळी दहा वाजता शंभर सेकंद आहे, त्या ठिकाणी उभा राहून लोकराजाला तमाम जनतेकडून मानवंदना देण्यात आली. सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबले आणि 100 सेकंद स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. यामुळे रोज रस्त्यावर असणारी वाहनांची गर्दी आणि गोंगाटा 100 सेकांदासाठी संपूर्ण पणे थांबला होता. दरम्यान, शाहू समाधी स्थळ येथे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले.यामुळे आज कोल्हापूर हे संपूर्णपणे शाहूमय झाल्याचे पाहायला मिळाले.
शाहू महाराजांना अभिवादन, मालोजीराजे यांची प्रतिक्रिया संसदेत जयंती साजरी करण्याचे काम करता आहेत - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची संसदेत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचे काम सहा वर्षांच्या राज्यसभेच्या कारकिर्दीत मला करता आले, याची आठवण माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केली.
राजर्षी शाहू महाराजांच्या निधनास १०० वर्ष पूर्ण -लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी झाला. या घटनेला आज रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे त्यांच्या कार्यास आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२ मे पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन शासनाकडून करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या विकासाचे रोल मॉडेल जगासमोर उभा केले. रयतेच्या सुखासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. रयतेची तहान भागवण्यासाठी राधानगरी येथे धरण बांधले तसेच शाहू मिलच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले. यामुळे आज ही कोल्हापूरकर त्यांच्या या दूरदृष्टीने केलेल्या कामाची फळे चाखत आहेत.
मंत्र्यांनी ही वाहिली लोकराजाला आदरांजली -कोल्हापुरात सकाळपासूनच शहरातील विविध भागातून शाहू महाराजांसाठी रॅली निघाली आणि शाहू समाधी स्थळ येथे एकत्र आले. यावेळी विविध तालुक्यातून ज्योत ही आणण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर, शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी सर्वांनी 100 सेकंद स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा -Shahu Maharaj Kolhapur : 100 सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन, वाचा... आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्याविषयी