महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यंदाही भवानी मंडपाला साखरमाळेचे तोरण नाही, सलग दुसऱ्या वर्षी परंपरा खंडित - कोल्हापूर भवानी मंडप

गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरातील माळकर कुटुंबीय रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली आहे.

यंदाही भवानी मंडपाला साखरेची माळ बांधण्याची परंपरा खंडित
यंदाही भवानी मंडपाला साखरेची माळ बांधण्याची परंपरा खंडित

By

Published : Apr 13, 2021, 11:23 AM IST

Updated : Apr 13, 2021, 11:30 AM IST

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापुरातील भवानी मंडपाला सारखरमाळ बांधण्याची परंपरा खंडित झाली आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुढी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापूरातील माळकर कुटुंबीय रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. मात्र कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही परंपरा खंडित झाली आहे.

यंदाही भवानी मंडपाला साखरमाळेचे तोरण नाही
काय आहे परंपरा?मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळते. शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे कोल्हापुरातील माळकर कुटुंबीय दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. गेल्या चार पिढ्यांपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडून तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. २५ फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत अखंड सुरू होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा खंडित झाली आहे.
Last Updated : Apr 13, 2021, 11:30 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details