महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर : पुराच्या जखमा विसरून लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी कुंभार गल्लीत गर्दी - कुंभार गल्ली कोल्हापूर

कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत गणेश मूर्ती घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे. कुंभार गल्लीतील दुकान सज्ज झाली आहेत.

लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत गर्दी

By

Published : Sep 2, 2019, 1:12 PM IST

कोल्हापूर - महापुरातून सावरत त्याच उत्साहात कोल्हापूरकर आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी कुंभार गल्लीत गर्दी करत आहेत. खरेतर महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका कुंभार गल्लीला बसला होता. संपूर्ण कुंभार गल्ली पाण्याखाली होती. जवळपास 10 ते 12 फूट पाणी कुंभारगल्लीत होते. त्यातून सावरत त्याच उत्साहात येथील दुकाने सज्ज झाली आहेत. सकाळपासून येथे गणेशभक्त बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात केला आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.

लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details