महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'त्यावेळी ते कोणाचे चमचे होते?', मुश्रीफ यांची पडळकरांवर टीका - kolhapur news today

खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत, असा टोला आमदार पडळकर यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ बोलत होते.

hasan mushrif
hasan mushrif

By

Published : Dec 18, 2020, 4:07 PM IST

कोल्हापूर -शरद पवार यांच्यावर बोलायला त्यांना अधिकार नाही. पाताळ घालून नौटंकी करणारे, खूप जण पवार साहेबांनी पाहिले आहेत, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत, असा टोला आमदार पडळकर यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ बोलत होते.

'सत्ता येऊनदेखील भाजपाने आरक्षण दिले नाही'

ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. पडळकर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून बारामतीमध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांच्या आंदोलनाला भेट देत कौतुक केले. जर आमची सत्ता आली तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन पडळकर यांना दिले होते. मात्र सत्ता येऊनदेखील धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे पडळकर त्यावेळी कोणाचे चमचे होते? आश्वासन पूर्ण केले नसताना ते आज भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार झाले? त्यांनी कशाची बक्षिसे मिळवली, असा सवालदेखील मुश्रीफ यांनी केला.

'संजय राऊत निर्भीड'

धनगर समाजाचा विश्वासघात करण्यासाठीच त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे, अशी टीका मुश्रीफ यांनी पडळकर यांच्यावर केली. खासदार संजय राऊत हे प्रामाणिकपणे आपली बाजू मांडत आहेत. त्यांचे वक्तव्य हे निर्भिड आहे. खासदार राऊत यांची कसलीच अपेक्षा नाही. मात्र पडळकर यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले.

'आता कळली असेल ताकद'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद काय? हे पहाटेच्या शपथविधीदिवशी कळाले. जर त्यांची पक्षात ताकद असती तर त्यांनी ते सरकार टिकवले असते, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी अजितदादांची ताकद काय आहे? अजून त्यांना कळलेच नाही. पदवीधर निवडणुकीत त्यांना ताकद कळली असल्याचा टोलादेखील मुश्रीफ यांनी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details