कोल्हापूर :अन्न वस्त्र निवारा हे माणसाचे 3 मूलभूत गरज आहेत. अनेक जण यातील काही गोष्टीपासून वंचित राहतात. अशांना सामाजिक संस्थाचा आणि दातृत्वाचा आधार असतो. फेब्रुवारी महिन्यात चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे हे दिवस साजरे केले जातात. मात्र गेल्या 4 वर्षापासून या समाजात असे देखील नागरिक आहेत. ज्यांना एका वेळेचे जेवण मिळत नाही, अशांसाठी रोटी डे साजरे करत आहेत. कोल्हापूरमध्ये काही युवकांनी मिळून रोटी डे साजरा करत आहेत. यात नागरिकांकडून अन्न धान्य गोळा करून भुकेलेल्याना खाऊ घालत आहेत. या उपक्रमाची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे.
Roti Day in Kolhapur : कोल्हापुरात भुकेल्यांसाठी साजरा होतो रोटी डे - फेब्रुवारी 2022
कोल्हापूर शहरातील युवक-युवती एकत्र येत गेल्या चार वर्षापासून रोटी डे ( Roti Day in Kolhapur ) साजरे करत आहेत. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे

काय आहे नेमक रोटी डे कशी सुचली कल्पना:
व्हॅलेंटाईन डे साजरा करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच टीका करत असतात. तसेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मेसेज देखील व्हायरल केले जात असतात. अशाच एका सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे यासारखे दिवस साजरे केले जातात. एक सोशल मिडीयावरील पोस्ट पाहून रोटी डे साजरी करण्याची संकल्पना सुचचली. म्हणून काही युवक चार वर्षापासून फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ऐतिहासिक अशा बिंदू चौकात रोटी डे साजरे करतात.
अभिनव उपक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
कोल्हापूर शहरातील युवक-युवती एकत्र येत गेल्या चार वर्षापासून रोटी डे साजरे करत आहेत. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. या आवाहनास मिळालेला प्रतिसाद पहाता नागरिक शिजवलेले अन्न, कडधान्य तसेच तांदूळ, गहू ,डाळ ,मीट, साखर, तेल यासारखे धान्य व कोरडा खाऊ म्हणजेच बिस्किट, फरसाण यासारखे जीवनावश्यक वस्तू बिंदू चौकात आणून देत आहेत. तसेच हे सर्व शिजवलेले अन्न कोल्हापुरातील विविध भागांमध्ये गरीब लोकांमध्ये वाटले जाते. तसेचएखाद्या गावातील गरीब कुटुंबांना किंवा आश्रमशाळांना देण्यात येते असे अशी माहिती कोल्हापूर युथ मूव्हमेंटसचे निलेश बनसोडे यांनी दिली.
दिवसभरात अनेक कोल्हापूरकरांनी केली मदत :
आज सकाळी 10 वाजता बिंदू चौकात अन्न स्वीकारण्यास सुरू झाले. त्यामुळे काही वेळातच तयार अन्न किंवा धान्य, कडधान्य आणायला लागले. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत अंदाजे 350 ते 400 लोकांनी मदत दिली आहे. ही सर्व मदत आज पासून वाटायला देखील सुरुवात झाली आहे.
हेही वाचा -Sanjay Raut on KCR CM Meet : 'राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची मांडणी'