महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्हा पूरव्यवस्थापन नियोजनाचा पालक सचिव प्रवीण दराडे यांनी घेतला आढावा - पूर परिस्थिती

पूरपरिस्थिती काळात (Flood conditions) व पूर परिस्थिती पश्चात आवश्यक असणाऱ्या कामाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करुन सर्व विभागांनी मिळून समन्वयाने परिस्थिती हाताळावी, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण (Praveen Darade) दराडे यांनी केल्या.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Jul 7, 2022, 4:00 PM IST

कोल्हापूर : संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व,कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीची (Panchganga river) पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. हवामान खात्यानेही 8 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्याशी संवाद साधला होता. यानंतर आज पालक सचिव प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थिती नियोजनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar), महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने 'टीम वर्क' म्हणून काम करा:अलमट्टी धरणातून (Almatti Dam) सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागाशी तसेच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही त्रुटी राहता कामा नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. कोणतीही घटना घडल्यास तात्काळ त्याठिकाणी पोहचण्यासाठी विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना करुन आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी 'टीम लीडर' म्हणून तर अन्य सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने 'टीम वर्क' म्हणून काम करावे अश्या सूचना प्रवीण दराडे (Praveen Darade) यांनी केल्या आहेत.तसेच पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करा. स्थलांतरीत नागरिकांच्या कँम्पमध्ये आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या. नेमुन दिलेल्या अधिकाऱ्यांनी त्या-त्या ठिकाणांची पाहणी केल्याचा अहवाल मागवून घ्या. पुराचे पाणी येणाऱ्या मार्गांवर व पुलांवर पोलीस कर्मचारी तैनात ठेवा. अशा सूचना ही त्यांनी बैठकीत केल्या आहेत.



पुरात ही शहराला मिळणार सुरळीत पाणीपुरवठा:बैठकी नंतर प्रवीण दराडे (Praveen Darade) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारी बाबत माहिती दिली आहे. दरवर्षी महापूर आले की शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व पंपिग स्टेशन मध्ये पाणी शिरते यामुळे कोल्हापूरचा पाणी पुरवठा पुढील अनेक दिवस बंद राहतो. मात्र या वर्षी महापालिकेच्या वतीने एक पंप हे पाण्यात बुडणार नाही अश्या प्रकारे हलवण्यात आले असून या पंपा मार्फत शहरातील 60% भागाला पुरातही सुरळीत पाणीपुरवठा होणार असून उर्वरित 40% भागाला ही पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना करण्यात आले असल्याचे प्रवीण दराडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details