महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोथरूड जितके मला माहित आहे, तितके कोणालाच माहित नाही' - कोथरूड विधानसभा मतदारसंघ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीला विरोध होत असल्याचे दिसत आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी 'कोथरूडकरांवर मला विश्वास, ते मला बाहेरचा बोलणार नाहीत', असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 1, 2019, 12:17 PM IST

Updated : Oct 1, 2019, 1:34 PM IST

कोल्हापूर -भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विद्यमान आमदार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या उमेदवारी बाबत विचारले असता, त्यांनी कोथरूडकरांवर मला विश्वास असून ते मला बाहेरचा बोलणार नाहीत, असे म्हटले आहे. तसेच कोथरूड जितके मला माहित आहे, तितके कोणालाच माहित नाही, असेही म्हटले आहे.

कोथरूडकरांवर मला विश्वास असून ते मला बाहेरचा बोलणार नाहीत, चंद्रकांत पाटीलांना निवडून येण्याबाबत विश्वास

हेही वाचा...चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ, उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध

कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात जातो. चंद्रकांत पाटील यांना पक्षाच्या वतीने पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला स्थानिक ठिकाणच्या काही संघटना आणि कार्यकर्त्यांचा विरोध होत, असल्याचे पहायला मिळत आहे. कोथरूड येथे आयात उमेदवार नको, असा सूर उमटताना दिसत आहे.

कोथरूड जितके मला माहित आहे, तितके कोणालाच माहीत नाही - पाटील

चंद्रकांत पाटील यांना याबद्दल विचारले असता, त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचा मी आमदार असल्याने तो माझ्या घरचा मतदारसंघ आहे. तेथून केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानुसारच मी निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. कोथरूडकर मला बाहेरचा म्हणणार नाहीत, असा विश्वास असल्याचेही, त्यांनी म्हटले आहे.

सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील - पाटील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने रागाने काहींची बंडखोरी होणे अटळ आहे, असे म्हटले आहे मात्र 7 ऑक्टोबरला हे सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा... भाजपची १२५ जणांची पहिली यादी जाहीर; 'यांना' मिळाली उमेदवारी

युतीचा फ़ॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही

युती झाली असून युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आता जनतेसमोर येण्याची गरज नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. युतीचा दणकून विजय होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र विद्यमान सर्वच आमदारांना उमेदवारी मिळणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी 4 ऑक्टोबरला सर्व स्पष्ट होईल, असे सांगत इच्छुक उमेदवारांच्या धाकधुकीत वाढ केली आहे.

Last Updated : Oct 1, 2019, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details