महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

... तर आम्ही आरक्षण सोडायला तयार, रामदास आठवलेंचे मोठे विधान

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. सगळंच आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नसल्याने जातीच्या आधारावरच आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे जाती व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे, असे आठवले म्हणाले.

ramadas athavle on reservation
जाती व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार - रामदास आठवले

By

Published : Dec 8, 2020, 5:12 PM IST

कोल्हापूर - मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध आहे. सगळंच आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नसल्याने जातीच्या आधारावरच आरक्षण आहे. त्यामुळे जाती व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो

आज आमच्या जातींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे जातीच्या आधारवरच आरक्षण असलेच पाहिजे. प्रत्येक जातीची जनगणना होणं गरजेचं आहे. कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. 2021 ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालय मराठा समाजाचा विचार करेल, अशी आशा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र कॅटगिरी करावी, सगळा मराठा समाज श्रीमंत नाही. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे.

जाती व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार - रामदास आठवले

महाविकास आघाडीचा बंद 'फेल'

महाविकास आघाडी सरकारचा हा बंद फेल आहे, असे आठवले म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी कृषी कायद्याच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीने यात राजकारण करू नये. शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची आहे. शेतकऱ्यांची भूमिका समजून घेऊन आवश्यक ते बदल करण्याची सूचना देखील पंतप्रधानांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details