महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना काळात मदतीचे योगदान; कोल्हापुरात मुस्लीम बांधवांची 'ईद' साध्या पद्धतीने साजरी - oxygen donate in ramdan

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांना रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही. मात्र या कोरोना काळात मुस्लीम बांधवांनी रुग्ण सेवा करून पुण्य कमवण्याची संधी सोडली नाही. अनेकजण स्वतःला झोकून देऊन समाजासाठी सेवा देत आहेत. यामध्ये बैतुलमाल कमिटी, मणेर मस्जिद, मुस्लीम बोर्डिंग, वेगवेगळ्या जमाती, संस्था, आजरेकर फाउंडेशन तसेच वयक्तिक पद्धतीने अनेक मुस्लीम बांधवांनी समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे.

मुस्लीम बांधवांची 'ईद' साध्या पद्धतीने साजरी
मुस्लीम बांधवांची 'ईद' साध्या पद्धतीने साजरी

By

Published : May 14, 2021, 10:00 AM IST

Updated : May 14, 2021, 10:58 AM IST

कोल्हापूर - मुस्लीम बांधवांसाठी सर्वात पवित्र म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सांगता म्हणजे रमजान ईद होय. गुरुवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर आज(१४ मे्) देशभरात सर्वत्र रमजान ईद साजरी केली जात आहे. मात्र प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी ईद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांना साध्या पद्धतीने साजरी करावी लागत आहे. दरम्यान, रमजान ईद ला किती महत्व आहे आणि कशा पद्धतीने दरवर्षी ईद साजरी केली जाते, यासंदर्भात ईटीव्हीभारतचा हा विशेष रिपोर्ट ..

कोरोना काळात मदतीचे योगदान
ईद दिवशी असते प्रत्येकाच्या घरी खाद्यपदार्थांची मेजवानी -'रमजान ईद' संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू धर्मात जशी दीपावली साजरी केली जाते त्याच उत्साहात मुस्लीम धर्मीय रमजान ईद साजरी करतात. जोपर्यंत चंद्रदर्शन होत नाही तोपर्यंत दररोज असे एक महिना रोजे पाळले जातात आणि शेवटच्या दिवशी रोजे सोडतात. वाईट संगतीपासून दूर राहून, आत्मशुद्धीकरणासाठी मुस्लीम बांधव या महिन्यात रोजे पाळतात. त्यामुळेच प्रत्येकाला तहान आणि भुकेचीही किंमत समजते. ईद दिवशी मुस्लीम बांधव मशिदीमध्ये जावून नमाज अदा करून अल्लाहची प्रार्थना करतात. या दिवशी प्रत्येक मुस्लीम बांधवांच्या घरी खाद्यपदार्थांची मेजवानी असते. शेवया, दूध आणि काजू बादाम आदी ड्राय फ्रुटस वापरून बनवलेला शीरखुरमा या पदार्थाला या दिवशी विशेष महत्त्व असते. सर्वच मुस्लीम बांधव आपापल्या मित्रपरिवाराला ईद दिवशी दावत सुद्धा देतात. मात्र कोरोनामुळे यावर्षी सलग दुसऱ्यांदा ते ईद साजरी करू शकत नाहीत. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी या कोरोनाच्या स्थितीत समाजातील गोरगरीब लोकांना विविध मार्गातून सेवा देत अनेक यंदाची ईद साजरी केली आहे.

आपल्या कमाईतला अडीच टक्के भाग समाजासाठी -

वर्षभरातील कमाईमधील केवळ अडीच टक्के भाग हा मुस्लीम बांधवांनी समाजातील गरजू लोकांवर खर्च करावा असे म्हंटले जाते. त्या नुसार प्रत्येक मुस्लीम बांधव वर्षभरात आपापल्या परीने शक्य ती सेवा करत असतो. कोरोना काळात सुद्धा सेवा करण्याची सर्वांनी संधी मिळाली असून अनेकजण स्वतःला झोकून देऊन समाजासाठी सेवा देत आहेत. यामध्ये बैतुलमाल कमिटी, मणेर मस्जिद, मुस्लीम बोर्डिंग, वेगवेगळ्या जमाती, संस्था, आजरेकर फाउंडेशन तसेच वयक्तिक पद्धतीने अनेक मुस्लीम बांधवांनी समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. काहींनी हॉस्पिटलमधील आयसीयू विभागासाठी मोठी मदत केली आहे, काहीजण मोफत ऑक्सिजन टाक्या देत आहेत, तर काही मुस्लीम बांधवांनी तर शेकडो मृतदेहांवर ज्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले आहेत. ईद जरी साजरी करू शकले नसले तरी आपल्या हातून पुण्य घडावे हाच यामागचा हेतू असतो, अशी माहिती कोल्हापूर मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी दिली.


कोरोना समूळ नष्ट व्हावा, भारत देश प्रगतीपथावर यावा-

कोरोनामुळे देशाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना समूळ नष्ट व्हावा आणि आपला देश पुन्हा एकदा प्रगतीपथावर यावा याच दुवा, प्रार्थना अल्लाहकडे करतो, असेही गणी आजरेकर यांनी म्हंटले आहे.


Last Updated : May 14, 2021, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details