महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राम शिंदेंनी घेतली संभाजीराजेंची भेट; धनगर आरक्षणाबाबत चर्चा - माजी मंत्री राम शिंदे बातमी

धनगर समाजाच्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर लगेच माजी मंत्री शिंदे यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठिंबा नेहमीच असणार असल्याचे सांगितले.

ram shinde meeting with Sambhajiraje
राम शिंदेंनी घेतली संभाजीराजेंची भेट

By

Published : Oct 2, 2020, 7:19 PM IST

कोल्हापूर - धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी शाहू महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. याआधी आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी संभाजीराजेंची भेट घेतली होती.

राम शिंदेंनी घेतली संभाजीराजेंची भेट

धनगर समाजाच्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर लगेच माजी मंत्री शिंदे यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठिंबा नेहमीच असणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपण लढाई करत आहोत, त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देऊ, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

शिवाय शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले, त्याच पद्धतीने त्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे ही आजही राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याची जबाबदारी असल्याचेही संभाजीराजेंनी नमूद केले. धनगर समाज प्रामाणिक समाज आहे. त्यांच्यासाठी सुद्धा लढा देऊ, असेही त्यांनी म्हटले. शिवाय गोलमेज परिषदेसाठी कोल्हापूरची जागा निवडली यासाठीसुद्धा त्यांनी धनगर समाजाचे अभिनंदन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details