कोल्हापूर -राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ( Rajvardhan Kadambande Support Raj Thackeray ) यांनी राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांच्या भूमिकेचे आपण समर्थन करत असल्याचे त्यांनी कोल्हापूरात म्हटले. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक ( Chhatrapti Shahu Maharaj ) येथे आज भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिले होते, त्याच पद्धतीने सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे, असेही म्हटले.
Mosque Loudspeaker Contraversy : छत्रपती शाहू महाराजांच्या पणतूकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन, म्हणाले... - राजवर्धन कदमबांडे कोल्हापूर राज ठाकरे समर्थन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ( Rajvardhan Kadambande Support Raj Thackeray ) यांनी राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांच्या भूमिकेचे आपण समर्थन करत असल्याचे त्यांनी कोल्हापूरात म्हटले. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारक ( Chhatrapti Shahu Maharaj ) येथे आज भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
'आरक्षण न्यायालयीन बाब मात्र...' -राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण आलो आहे. मात्र, राज्यातील सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर आपण काहीही बोलणार नाही. शिवाय मराठा आरक्षणाबाबत सुद्धा बोलताना ते म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा सद्या न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. मात्र, शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या काळात आरक्षण दिले होते, त्याच पद्धतीने आरक्षण या राज्यात लागू व्हायला हवे, या मताचा मी असल्याचेही ते म्हणाले. शिवाय राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेचे समर्थन करत असल्याचेही ते म्हणाले.