कोल्हापूर -स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद झाले होते. मात्र पेल्यातील वादळ दोन दिवसापूर्वीच शातं झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संघटनेत सक्रीय आहेत. मतभेद दूर झाल्यानंतर ते शांत होतात. आमच्यातील गैरसमज दुर झाले आहेत. शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न व चळवळ महत्वाची आहे. या मुद्यावरून एक दोन पावले पुढे मागे करावे लागले याच मद्यावरून हे वादळ शांत झाले आहे.
चळवळ महत्वाची असल्यामुळे संघटनेंतर्गत पेल्यातील वादळ शांत - राजू शेट्टी - News about Raju Shetty
पेल्यातील वादळ चळवळ महत्वाची असल्यामुळे शांत झाले आहे. कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर झाले आहेत. अशी भूमीका राजू शेट्टी यांनी ई टीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत मांडली.
चळवळ महत्वाची असल्यामुळे पेल्यातील वादळ शांत - राजू शेट्टी
राजू शेट्टी यांनी ई-टीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत ही भुमिका व्यक्त केली आहे. विधान परीषदेतील उमेदवारीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद झाले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांची राजू शेट्टी यांच्या बरोबर बैठक झाल्यावर हे मतभेद दुर झाल्याचे पहायला मिळाले होते. या विषयी त्यांनी ईटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भुमिका स्पष्ट केली. यावेळी चळवळ महत्वाची असल्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.