महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देवेंद्र भूयार नवखे आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू - News about Devendra Bhayar

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भूयार यांनी मला पक्षातील वरfष्ठ नेत्यांमुळे मंत्री पद मिळाले नाही, असा आरोप केला होता. यावर राजू शेट्टी यांनी ते नवखे आहेत. त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू, असे ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

Raju Shetty said let's get Devendra Bhuyar's understanding
देवेद्र भूयार नवखे आहेत, त्यांची आम्ही समजूत काढू

By

Published : Jun 22, 2020, 10:38 PM IST

कोल्हापूर - जे राजीनामा नाट्य झाले, ते नियोजित होते. मला मिळणारे मंत्रिपद वरिष्ठ नेत्यांमुळे मिळाले नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भूयार यांनी केला होता. या विषयी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भूयार हे नवीन आहेत. ते नवखे आहेत. त्यांचा ही गैरसमज लवकरच दूर होईल. ते माझेच कार्यकर्ते आहेत. त्यांना निवडून आम्हीच आणले आहेत, आम्हीच त्यांना समजावून सांगू असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेच्या आमदारकी वरून संघटनेत मतभेद निर्माण झाले होते. या विषयी आमदार देवेंद्र भूयार यांनी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिला होता. वरिष्ठ नेत्यांमुळेच मंत्रिपद मिळाले नाही, असा आरोप केला होता. या विषयी राजू शेट्टी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details