कोल्हापूर - भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. तो कोणी केला? हा मुद्दा गौण आहे. मात्र किरीट सोमैय्या हे केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहेत. ते मुंबई बँकेच्या भ्रष्टाचारावर गप्प का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
राजू शेट्टी यांचा सोमैय्यांना प्रश्न -
पुढे राजू शेट्टी म्हणाले की, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच आहे. तो कोणत्या पक्षाने केला किंवा कोणत्या अधिकाऱ्याने केला हा मुद्दा गौण आहे.मात्र अलीकडच्या काळात भाजपचे नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून किरीट सोमैय्या यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. ते व्यवसायाने सीए असल्यामुळे त्यांना या क्षेत्रातील अधिक माहिती आहे. याबद्दल आमचे दुमत नसल्याचे शेट्टी म्हणाले. मात्र मुंबई बँकेतील घोटाळा संदर्भात ते का बोलत नाहीत. देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत का बोलत नाहीत? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.