कोल्हापूर - कोरोना पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे अस्मानी संकट आले, या काळात शेतकऱ्यांची वीज बिले थकीत राहिली, काही प्रमाणात शेतकऱ्यांनी की भरली सुद्धा मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली ( farmer electricity cut in kolhapur ) जात आहे. वीज दरासाठी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील सत्तेत गेल्यानंतर मात्र गायब आहेत, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खुलेआम तोडले जात असताना पालकमंत्री मात्र तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत अशी ( Raju Shetti Criticize Satej Patil ) टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन येत्या 14 फेब्रुवारी ला कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे.
राजु शेट्टी यांची प्रतिक्रिया 'ऊसाच्या Frp चा दुसरा हप्ता 200 रुपये द्या'
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. ऊसाच्या Frp चा दुसरा हप्ता 200 रुपये द्या या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक आता आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यात जाऊन निवेदन देणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. जर कारखान्यांनी प्रतिसाद न दिल्यास आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
शेतकरी मेटाकुटीला आल्याने एफआरपी वाढवून मिळावी -
गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका उडला आहे. पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे शेतात वापरणाऱ्या खतांची देखील मोठी दरवाढ झाली आहे.त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून मालाला पुन्हा विकायला नेला तर वाहतुक खर्च वाढला असल्याने शेतकऱ्याला 3 वर्षांपूर्वी जेवढे पैसे हातात पडत होते तितकेच आता पडत आहेत. म्हणजे लागवड जास्त आणि फायदा कमी असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याने एफआरपी वाढवून मिळावी अशी देखील मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे वीज दर कमी करा -
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही महिन्यांपूर्वी महापुराचा सामना करावा लागला होता. महापुरात अनेक शेतकऱ्यांचे पंप पाण्याखाली गेले होते तसेच एडिट डीपी देखील जळाले होते ते अद्याप देखील महावितरण मार्फत दुरुस्त करून देण्यात आलेले नाहीत याउलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी महावितरण वर केली आहे तसेच कोरडा काळात रीडिंग घेणारा माणूस घरात बसून रडत कमिशन घेत अंदाजे मिटर रिडींग पाठवले असल्याने शेतकऱ्यांचा चुकीचे विज बिल दिली गेली आहेत. वाढलेल्या वीज बिलाचे समाधानकारक उत्तर मात्र कोणीही देत नाही ज्या विचाराला गेलेल्या शेतकऱ्यांना 353 कलम लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जे देणं लागत नाही ते आम्ही का भराव असा सवाल ही राजू शेट्टी यांनी महावितरण ला विचारला आहे. उत्तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांच अनुदान देणार असल्याची घोषणा केली होती त्याच काय झाले ? अजित पवार यांना या बद्दल विचारले असता अजित पवार फक्त देणार आहे म्हणतात. पुढे काहीच बोलत नाहीत. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून 60 टक्के वसुली झाली असताना 353 कलम का लावत आहात. आम्हाला 2 तास वीज वाढवून द्या. तसेच वीज दर कमी करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे नेते गप्प का?
राज्यात अनेक ठिकाणी महामार्ग होत आहेत यासाठी लागणारी भूमी ही शेतकऱ्यांकडून घेतली जाते. 6 ऑक्टोबर आणि 14 जानेवारी 2021 जानेवारी ला शासन निर्णय झाला. हा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे या भूमीअधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मोबदल्यात 70 टक्के घट होणार आहे.महाविकास आघाडीतील जे नेते केंद्रा वर टीका करतात ते आज गप्प आहेत म्हणत राजू शेट्टींनी सरकारला धारेवर धरले आहे.
अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा -
येत्या अधिवेशनामध्ये अजित पवार अर्थसंकल्प मांडणार असून या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करून बजेटमध्ये देखील तरतूद करावी. बाकीचे खर्च कमी करा आणि शेतकऱ्याला वाचवा. कारण कोरोना काळात शेतकऱ्यांनीच राज्य सरकारला वाचवले आहे. या बजेटमध्ये जर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची तरतूद अजित पवार यांनी केली नाही तर त्यांना ग्रामीण भागात येणं अवघड करून टाकू असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हेही वाचा -Maha Govt Wine Sale Permission : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन