महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil On Raj Thackeray : हिंदूला आनंद होणारे राज ठाकरेंचे भाषण - चंद्रकांत पाटील - राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

सामान्य हिंदू ला मनामध्ये आनंद होणारे भाषण झाले अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबई येथे पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांचे भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण आल्याचे ते म्हणाले. शिवाय जातीय तेढ निर्माण होईल याचा विचार करूनच आजपर्यंत हिंदू दबला गेला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Apr 3, 2022, 1:30 PM IST

Updated : Apr 3, 2022, 2:30 PM IST

कोल्हापूर - सामान्य हिंदू ला मनामध्ये आनंद होणारे भाषण झाले अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबई येथे पार पडलेल्या राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांचे भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण आल्याचे ते म्हणाले. शिवाय जातीय तेढ निर्माण होईल याचा विचार करूनच आजपर्यंत हिंदू दबला गेला आहे. (Chandrakant Patil On Raj Thackeray) ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील

मुस्लिमांनीच मंदिरं पाडली - सर्व नियम फक्त हिंदुनीच पाळायचे का? हा देश हिंदूंचा आहे नंतर इथे मुस्लिम आक्रमण करून आले आहेत. तुमच्या अजानप्रमाणे आरती सुद्धा झाली पाहिजे. (Raj Thackeray Speech Of Gudi Padva 2022) हिंदूंनी कधीही मस्जिद पाडली नाही उलट मुस्लिमांनीच मंदिरं पाडली हे इतिहास सांगतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

बुडत्या जहाजाची कॅप्टनशिप कोण करेल -बुडत्या जहाजाची कॅप्टनशिप कोण करेल आशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. (Chandrakant Patil Vs Raj Thackeray ) आज कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मला युपीए चे नेतृत्व करण्यात रस नसून मी जी काही मदत करणे शक्य होईल ती सर्व करायला तयार असल्याचे म्हंटले होते त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली.


मनसे 2019 साली तुमची बी टीम होती का ? -भाजप नेहमीच बी टीम घेऊन निवडणुकीला सामोरे जाते. अशा पद्धतीचा आरोप केल्यानंतर त्यावर आपली प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 साली राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत ज्या सभा घेतल्या हे सर्व शरद पवार यांनी करायला लावले. त्यावेळी मनसे तुमची बी टीम होती का असा सवाल करत आम्ही कधीही भेट घेऊन राजकारण करत नाही आणि आम्हाला त्याची सवय नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा -Raj Thackeray : राज कडाडले! राजकीय नेत्यांवर घणाघात; मतदारांचेही टोचले कान

Last Updated : Apr 3, 2022, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details