कोल्हापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सक्तवसुली संचालनालया (ईडी)कडून सुरू असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ कोल्हापुरातील मनसैनिकांनी शिवाजी चौकात काळी वस्त्रे घालून निदर्शने केली. यावेळी आत्महत्या केलेल्या मनसैनिकाला श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
कोल्हापुरातील मनसैनिकांनी काळी वस्त्रे घालून केली निदर्शने - सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी
सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे सरकार घाबरले आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई करून विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची सरकारची खेळी आहे.
कोल्हापुरातील मनसैनिकांनी काळी वस्त्रे घालून केली निदर्शने
सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे सरकार घाबरले आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई करून विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची सरकारची खेळी आहे, असे मनसे परिवहन अध्यक्ष राजू जाधव यांनी म्हटले आहे.