महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीचा 'बस'मधून आनंद घेता येणार फक्त 300 रुपयांत! - Kolhapur Wildlife Department

राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास 15+2 सीटर बस घेण्यात आली आहे. कोल्हापूर येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघणार आहे. एका पर्यटकाला नाममात्र 300 रुपये फीमध्ये एकवेळ चहा, नाष्ट्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

started new bus for Radhanagari, Dajipur Jungle Safari
राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीसाठी 'बस' सुरू

By

Published : Sep 2, 2021, 8:31 PM IST

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने 'जंगल सफारी बस' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना अगदी माफक दरात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. या उपक्रमामुळे देश विदेशातून राधानगरी परिसराच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही सोय होणार असून त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे.

राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीसाठी नवीन बस सुरू

जैवविविधतेने नटलेले 'दाजीपूर अभयारण्य' -

रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातल्या दाजीपुर अभयारण्यात दरवर्षी हजारो नागरिक जंगल सफारीसाठी येत असतात. याठिकाणी विविध रानगव्यांसोबतच विविध पशुपक्षांची याठिकाणी आतापर्यंत नोंद झाली. त्यामुळे इथे जंगल सफारीचा काही वेगळाच आनंद असतो. त्यामुळेच पर्यटकांना आता जंगल सफारी अधिकच सुलभ व्हावी यासाठी 'जंगल सफारी बस' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. केवळ 300 रुपयांमध्ये दिवसभर या बस मधून जंगल सफारी करू शकणार आहे. त्यामुळे अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

300 रुपयात दिवसभर आंनद -

राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास 15+2 सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी दररोज सकाळी 7 वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क, नाना नानी पार्क समोर, कोल्हापूर येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघणार आहे. एका पर्यटकाला नाममात्र 300 रुपये फीमध्ये एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून काय काय पाहता येणार?

राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी डॅम बोटिंग व दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र आणि गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना देखील मोफत जंगल सफारी करता येणार आहे. या बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांचे कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक-0231- 2669730 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details