महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर : दर्शनाच्या ई-पासविरोधात भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापुरात देवाच्या दारी ई-पासची गरज का, असा प्रश्र उपस्थित करत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या दर्शनासाठी ई-पास रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

kolhapur latest news
kolhapur latest news

By

Published : Oct 26, 2021, 2:31 PM IST

कोल्हापूर - राज्यभरात मंदिरे खुली झाली असताना कोल्हापुरात देवाच्या दारी ई-पासची गरज का, असा प्रश्र उपस्थित करत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या दर्शनासाठी ई-पास रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे.

प्रतिक्रिया

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने -

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली. कोल्हापुरातील धार्मिक स्थळ सुरु करण्यात आल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाच्या दर्शनासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला. भाविकांना ई-पास सक्तीचा करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून याचा निषेध करण्यात आला. मात्र, दसऱ्याच्या कालावधीत ई-पास शिवाय दर्शन नसल्याने भाविकांचा वर्दळ कमी पाहायला मिळाली. मात्र, दसरा झाल्यानंतरदेखील इ-पास कायम ठेवल्याने पर्यटक आणि भाविकांनीदेखील कोल्हापूरकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, या मंदिरावर अनेक छोटे मोठे व्यवसाय आणि फेरीवाले यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परिणामी याचा फटका त्यांना बसत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दोन्ही मंदिरात असणारा ई-पास रद्द करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. आज त्याचा निषेधार्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा -आमची लढाई एनसीबीशी नसून, समीर वानखेडेंसारख्या भ्रष्ट लोकांशी - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details