महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Front Line Workers Vaccination Kolhapur : कोल्हापुरात फ्रन्टलाइन वर्करच्या बूस्टर डोसला सुरुवात; टप्प्याटप्प्याने कोरोना योद्ध्यांचे होणार लसीकरण - कोल्हापुरात फ्रन्टलाइन वर्करच्या बूस्टर डोसला सुरुवात

गेल्या काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा ( Booster Dose in India ) केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहेच. तसेच, आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यासही आजपासून सुरुवात ( Booster Dose In Kolhapur ) झाली आहे. कोल्हापुरात देखील महानगरपालिकेच्या वतीने आजपासून पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण मोहीमची सुरुवात ( Front Line Workers Vaccination Kolhapur ) करण्यात आली आहे.

Front Line Workers Vaccination Kolhapur
कोल्हापुरात फ्रन्टलाइन वर्करच्या बूस्टर डोसला सुरुवात

By

Published : Jan 10, 2022, 3:24 PM IST

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा ( Booster Dose in India ) केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहेच. तसेच, आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यासही आजपासून सुरुवात ( Booster Dose In Kolhapur ) झाली आहे. कोल्हापुरात देखील महानगरपालिकेच्या वतीने आजपासून पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण मोहीमची सुरुवात ( Front Line Workers Vaccination Kolhapur ) करण्यात आली आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

पालकमंत्र्याच्या हस्ते लसीकरणासाठी सुरुवात -

महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कोविशील्डचे बुस्टर डोस देण्यात येत आहे. तर त्याकरीता आज 8,146 इतके लाभार्थी अपेक्षित आहेत. त्यापैकी 5,764 इतके हेल्थ केअर वर्कर, 1,670 इतके फ्रंट लाईन वर्कर तसेच 712 हे 60 वर्षावरील नागरीक आहेत. मात्र आज कोल्हापूर जिल्ह्यात आज पहिल्याच दिवशी सकाळी 2 तास काही ठिकाणी लसीकरण मोहीम खोळंबल्याचे पाहायला मिळाले. कोविन ॲप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 2 तास लसीकरण बंद होते. मात्र तांत्रिक समस्या सुटल्यानंतर लसीकरण मोहिमेस पुन्हा सुरुवात झाली. पोलिसांसाठी कोल्हापूर शहरात कसबा बावडा येथील अलंकार हॉल येथे लसीकरणाची सोय करण्यात आली होती.तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते लसिकरणासाठी सुरुवात झाली.

पोलिसांनसाठी कोल्हापुरातील अलंकार येथे लसीकरण -

कोल्हापूर पोलिसांसाठी पहिल्याच दिवशी कसबा बावडा येथील अलंकार हॉल येथे लसीकरणाची सोय करण्यात आली होती. सकाळ पासूनच अनेक पोलीस कर्मचारी लस घेण्यासाठी येथे उपस्थित होते.मात्र तांत्रिक कारणास्तव लसीकरण काही काळ खोळंबल्याने सर्व पोलिसांना ताटकळत थांबावे लागले. मात्र तब्बल दोन तासांनंतर लसीकरणासाठी पुन्हा सुरुवात झाली. आणि सर्व पोलिसांनी बूस्टर लसीचा तिसरा डोस घेतला.दरम्यान कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रस्त्यावर उभा असलेला पोलिस हा महत्त्वाचा भाग असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य देत आहोत. यामुळे लसीकरणाची सुरूवात पोलिसांमार्फत सुरू करत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्वच फ्रन्टलाइन वर्कर्सला टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे देखील पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

काय आहे नियमावली?

  • येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत.
  • ज्यांचे दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र ठरतील.
  • ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार
  • 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा लागले.
  • सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे.
  • ज वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल.
  • आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड योद्धे ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे आणि ज्यांची कोविन ॲपवर नागरिक अशी वर्गवारी झाली आहे. अशा लाभार्थ्यांना लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रात ऑन द स्पॉट पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स ना नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

हेही वाचा -Booster Dose From Today : आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात; वाचा काय आहे नियमावली

ABOUT THE AUTHOR

...view details