कोल्हापूर -संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार व भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यात पाहायला मिळाली. महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव करत विजय खेचून आणला आहे. दरम्यान कोल्हापुरात महाडिक कुटुंबीयात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून कोल्हापूरचे लोक प्रामाणिक आहेत. मी जे पेरले ते उगवून येत आहे. जिल्ह्यातील राजकारण बदलणार नाही, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण फार काळ टिकत नाही, चांगले राजकरण टिकत असते, अशी प्रतिक्रिया माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
स्वार्थ ठेवून केलेले राजकारण फार काळ टिकत नाही - महादेवराव महाडिक - rajya sabha election Mahadik reaction
राजकारणात बेरीज वजाबाकी होत असते. पण महाडिकांनी ( Mahadevrao Mahadik on rajya sabha election ) त्याचे राजकारण केले नाही. स्वतःचे काम धंदे सांभाळून राजकारण केले आहे. जनतेने मला जे दिले मी जनतेला देत राहीन. या जिल्ह्याला लाखवेळा नमस्कार केला तरी ऋण फिटणार नाही, असे महादेवराव महाडिक म्हणाले.
गेल्या अनेक निवडणुकांत महाडिक कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागत होता, मात्र राजकारणात बेरीज वजाबाकी होत असते. पण महाडिकांनी ( Mahadevrao Mahadik on rajya sabha election ) त्याचे राजकारण केले नाही. स्वतःचे काम धंदे सांभाळून राजकारण केले आहे. जनतेने मला जे दिले मी जनतेला देत राहीन. या जिल्ह्याला लाखवेळा नमस्कार केला तरी ऋण फिटणार नाही, असेही महादेवराव महाडिक म्हणाले.
माझे राजकारण हे नेहमी चांगल्यासाठी असते. स्वार्थ ठेवून केलेले राजकारण फार काळ टिकत नाही. हरल्यावर महाडिक कुटुंब संकटात येणार नाही. ज्यावेळी देव आमच्यावर संकट आणेल तेव्हाच ते माझ्यावर संकट असेल, असे ही महादेवराव महाडिक म्हणाले. तसेच पृथ्वी गोल आहे, माणसाची नितीमत्ता चांगली असेल तर सर्व गोष्टी चांगल्या होतात, हे निकालातून स्पष्ट होत आहे. या जिल्ह्याला लाखवेळा नमस्कार केला तरी ऋण फिटणार नाही, असे म्हणत ही लोकसभेची रंगीत तालीम आहे, असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो होतो आणि आम्ही ती जिंकली. महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे महादेवराव महाडिक म्हणाले.