कोल्हापूर- जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे आई-वडीलांकडूनच मुलाची विष पाजून हात-पाय बांधत विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलासह मानलेला मामा आणि अन्य दोघांना अटक केली आहे.
धक्कादायक..! दारूच्या आहारी गेलेल्या तरुणाला आई-वडिलांनीच विष पाजून विहिरीत दिले ढकलून - हातकणंगले
अनिकेत हा दारुच्या आहारी गेला होता. तो घरात सतत दारुसाठी पैशाची मागणी करत. यासाठी तो शिवीगाळ करत गोंधळ घालयचा.
अनिकेत वाळवेकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत हा दारुच्या आहारी गेला होता. तो घरात सतत दारुसाठी पैशाची मागणी करत. यासाठी तो शिवीगाळ करत गोंधळ घालयचा. अनिकेतचे दारू पिणे त्याच्या आई-वडीलांना खटकत होते. त्यांनी अनिकेतचे वागणे सहन न झाल्याने विष पाजले आणि हात-पाय बांधून त्याला विहिरीत फेकून देत त्याची हत्या केली. अनिकेतची हत्या करताना त्याचा मानलेला मामा आणि दोघे असे ५ जण सामिल होते.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अनिकेतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.