कोल्हापूर - ऐतिहासिक पन्हाळा गडावर ( Panhalagad ) काही पर्यटकांनी केलेल्या ओल्या पार्टीचा व्हिडिओ ( Video of party ) समोर येताच आता पन्हाळा पोलिसांनी ( Panhalagad Police ) संबंधित पर्यटक आणि झुणका भाकरी केंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. येथील एका झुणका भाकर ( Zunka Bhakar ) केंद्रावर दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी झुणका भाकर केंद्राची चौकशी केली. झुणका भाकर केंद्रांच्या पिछाडीस चालक दिलीप गणपती अतिग्रे यांची झडती घेतली. त्यांच्याकडे 7 दारुच्या बाटल्या सापडले आहेत. विनापरवाना दारू विक्रीच्या ( Sale liquor without license ) उद्देशाने दारूच्या बाटल्या जवळ बाळगल्या बद्दल महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या ओली पार्टी करणाऱ्या पर्यटकांचा, महिलांचा शोध चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली आहे.
संबंधित पर्यटकांचा शोध सुरू - पन्हाळा येथील दिलीप गणपती अतिग्रे ही व्यक्ती गडावरील शिवतीर्थ नजीक झुणका भाकर डॉट- कॉम या नावचे झुणका भाकर केंद्र चालवतो. याच केंद्रावर दिवसाढवळ्या पुरुष आणि महिला पर्यटकांनी दारूची ओली पार्टी झाली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली होती. शिवप्रेमी आणि गड प्रेमींनी सुद्धा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. याची दखल घेत, पन्हाळा पोलिसांनी चौकशी यंत्रणा गतिमान केली आहे. दारू पार्टी प्रकरणी- झुणका भाकर केंद्र आणि पर्यटकांवर पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओल्या पार्टीत सहभागी पुरुष आणि महिलांचा शोध घेतला जात आहे. तसेच असा प्रकार घडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिला आहे.