कोल्हापूर : तंबाखू दिली नाही म्हणून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी उद्यम नगर परिसरातल्या कोटीतीर्थ तलाव येथे आज सकाळी ही घटना घडली. एकीकडे गणेश विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे ही धक्कादायक घटना समोर आली. शंकर सखाराम कांबळे, (वय 56 रा. माळापुढे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. राजारामपुरी पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.
आपल्या मुलीकडे राहायला आलेल्या व्यक्तीचा खून -यातील मृत शंकर सखाराम कांबळे हे आपल्या मुलगीकडे राहायला आले होते. आज सकाळी कोटी लतीर्थ तलाव परिसरात फिरायला गेले असता या ठिकाणी संशयित आरोपी ओंकार शेंडगे (वय 28, रा. यादवनगर) आणि अजय सूर्यगंध (वय 27, रा. यादवनगर) यांनी कांबळे यांच्याकडे त्यांनी तंबाखू मागितली. मात्र आपल्याकडे तंबाखू नसल्याचे सांगत ते पुढे निघून गेले. संशयित दोघांनी कांबळे यांना पकडून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांना तंबाखू सापडली. आपल्याशी खोटं का बोलला या रागातून दोघांनी कांबळे यांना बेदम मारहाण केली. शिवाय शेजारील दगड व बांबूने त्यांना मारहाण केली त्यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत कांबळे रस्त्यालगतच पडले.
Murder story Udyam Nagar तंबाखूचा बार ठरला मृत्यूला कार, तंबाखू दिली नाही म्हणून कोल्हापुरात एकाचा खून - कोटीतीर्थ तलाव येथे सकाळी एकाचा खून
कोल्हापुरातल्या शिवाजी उद्यम नगर परिसरातल्या कोटीतीर्थ तलाव येथे सकाळी एकाचा खून झाला. गणेश विसर्जनाचा उत्साह असताना दुसरीकडे ही धक्कादायक घटना समोर आली. शंकर सखाराम कांबळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन आरोपींपैकी एकाला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. राजारामपुरी पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.
तंबाखूचा बार ठरला मृत्यूला कार
अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू -याप्रकारामध्ये अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला. यामधील एका आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याच परिसरात एका सीसीटीव्हीमध्ये हे दोघेही संशयित कैद झाले आहेत. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फसवले; लालबाग राजा दर्शनानंतर अमित शाह यांची ठाकरेंवर टीका