कोल्हापूर -राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत सुद्धा आता वाढ होणार असून ही सदस्य संख्या 81 वरून आता 92 इतकी होणार आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाढलेल्या सदस्यसंख्येच्या निर्णयाचा नेमका कोणाला फायदा होणार हे पाहावे लागणार आहे.
त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनंतर दुसऱ्या महत्वपूर्ण निर्णयाने आता सर्वांनाच निवडणुकीची उत्सुकता -
राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका तसेच नगर परिषदांमधील सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. त्यानुसार अधिनियमात नमूद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत सुद्धा आता वाढ होणार असून ही संख्या 81 वरून 92 वर जाणार आहे. तब्बल 11 सदस्य वाढणार असून इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयानंतर घेतलेल्या या दुसऱ्या महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्वांचेच लक्ष आता आगामी निवडणुकीकडे लागले असून वाढलेल्या सदस्य संख्येचा फायदा कोणाला होणार हेच पाहावे लागणार आहे. शिवाय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेतील सदस्यसंख्या आता 81 वरून 92 वर; मंत्रिमंडळ बैठकीत 'हा' प्रस्ताव मंजूर
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत सुद्धा आता वाढ होणार असून ही सदस्य संख्या 81 वरून आता 92 इतकी होणार आहे.
हे ही वाचा -पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक
काय केले आहेत बदल ? -
1) 3 ते 6 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची किमान संख्या 76 आणि जास्तीत जास्त 96 असेल.
2) 6 ते 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची किमान संख्या 96 आणि जास्तीत जास्त 126 असेल.
3) 12 ते 24 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची किमान संख्या 126 आणि जास्तीत जास्त 156 असेल.
4) 24 ते 30 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची किमान संख्या 156 आणि जास्तीत जास्त 168 असेल.
5) 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या महानगरपालिका सदस्यांची किमान संख्या 168 आणि जास्तीत जास्त 185 असेल.