कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 434 वर आली आहे. शिवाय सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येईल असे बोलले जात असले तरी कोल्हापुरातील हे चित्र मात्र दिलासादायकच म्हणावे लागणार आहे.
आज दिवसभरात 19 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारीनुसार एकूण 49 हजार 21 रुग्णांपैकी 46 हजार 911 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1676 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 434 इतकी झाली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर कोरोनामुक्त होईल असे सर्वजण आशा करत आहेत.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या आकडेवारीवर एक नजर :
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :