महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोकुळ निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान; कौल कोणाला? याकडे सर्वांच्या नजरा - gokul election

उद्या 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान
गोकुळ निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान

By

Published : May 3, 2021, 12:16 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघासाठी कोरोना काळातही तब्बल 99.78 टक्के इतके मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन्ही गटांचा उत्साह पाहायला मिळत होता. अनेक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही गटांनी मतदानाआधीच आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही गटांतील या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी 99.78 टक्के मतदान
तालुकानिहाय झालेल्या मतदानावर एक नजरजिल्ह्यातील 12 तालुक्यांत एकूण 3 हजार 647 इतके मतदार होते. त्यातील 3 हजार 639 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 887 महिला तर 2 हजार 752 पुरुष मतदार होते. जिल्ह्यात एकूण 99.78 टक्के इतके मतदान झाले.1 ) गगनबावडा : या तालुक्यात एकूण 67 मतदार होते त्यातील 75 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 98.68 टक्के इतके झाले. 2) हातकणंगले : या तालुक्यात एकूण 95 मतदार होते त्यातील 95 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 3) शिरोळ : या तालुक्यात एकूण 133 मतदार होते त्यातील 133 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 4) राधानगरी : या तालुक्यात एकूण 458 मतदार होते त्यातील 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 99.78 टक्के इतके झाले. 5) गडहिंग्लज : या तालुक्यात एकूण 272 मतदार होते त्यातील 272 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 6) शाहूवाडी : या तालुक्यात एकूण 286 मतदार होते त्यातील 285 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 99.65 टक्के इतके झाले. 7) पन्हाळा : या तालुक्यात एकूण 353 मतदार होते त्यातील 353 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 8) आजरा : या तालुक्यात एकूण 233 मतदार होते त्यातील 232 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 99.57 टक्के इतके झाले. 9) करवीर : या तालुक्यात एकूण 639 मतदार होते त्यातील 639 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 10) भुदरगड : या तालुक्यात एकूण 373 मतदार होते त्यातील 369 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 98.93 टक्के इतके झाले. 11) चंदगड : या तालुक्यात एकूण 346 मतदार होते त्यातील 346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले. 12) कागल : या तालुक्यात एकूण 383 मतदार होते त्यातील 383 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या तालुक्यात एकूण मतदान 100 टक्के इतके झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details