कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आहे. अशा ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे खूप मानाची गोष्ट आहे, तितकेच आव्हानात्मक काम असून, जबाबदारीसुद्धा मोठी असल्याचे कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले. आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
एसपी शैलेश बलकवडे यांनी स्वीकारला पदभार; म्हणाले...
आज सकाळी शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
बलकवडे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम झाले आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी रोखण्यात यश मिळाले होते. यापुढेसुद्धा चांगल्या कामाचा आलेख कायम ठेऊन त्यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची 18 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीणला बदली झाली. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी बलकवडे यांनी पदभार स्वीकारला.