कोल्हापूर - कोल्हापूरात पावसाचा ( Heavy Rain In Kolhapur ) जोर वाढतच चालला असून, पंचगंगा नदीच्या ( Panchganga river ) पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. रात्री उशीरा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून नदीची पाणीपातळी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. जिल्ह्यातील ( district ) जवळपास 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ( District Administration ) नदीकाठच्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या ( NDRF Team ) दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळमधील टाकळीवाडी येथे पोहचली आहे. दुसरीकडे तुकडी कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ( Collector Office ) दाखल झाली आहे.
संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा 9 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
आम्ही आहोत ! कोल्हापूरकरांनो तुम्ही घाबरु नका :- बृजेश कुमार रैकवार -दरम्यान, जिल्ह्यात दाखल झालेल्या एनडीआरफच्या 2 तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरीकडे तुकडी शिरोळ तालुक्यात काम करणार आहे. प्रत्येक तुकडीत 25 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करणार आहे. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य चांगल्याप्रकारे करेल. त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरु नये, असे आवाहन यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार यांनी केले आहे. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.