कोल्हापूर - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या घणाघात केला आहे. मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून मोठे व्हायचे ही पद्धत चित्रा वाघ यांची असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. कोल्हापुरात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद ( vidya chavan criticized chitra wagh ) साधला.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही. काही जणांकडून महाविकास आघाडीमध्ये काहीतरी धुसफूस आहे, असे चित्र रंगवले जाते. मात्र, महाविकास आघाडीचे तिने पक्ष एकत्र असल्याने पुढच्या पन्नास वर्षात तरी महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही. त्यामुळे भाजप काही जणांना खास फक्त राष्ट्रवादी व शरद पवार यांच्यावर वाईट बोलण्यासाठी पक्षात घेतले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
विद्या चव्हाण प्रसारमाध्यमांशी बोलताना 'आम्ही तळागळात काम करुन...' - सरशी तिकडे पारशी म्हणले जाते, त्याप्रमाणे चित्रा वाघ यांची सध्याची परिस्थिती आहे. त्यांना काहीतरी पाहिजे यासाठी सापशिडी प्रमाणे मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून मोठा व्हायचं आणि दान पाडून घ्यायचे काम चित्रा वाघ करत आहेत. यातूनच त्या मोठ्या झाल्या आहेत. पण, आम्ही तळागाळात काम करून मोठे झालो आहोत. यामुळे त्यांच्यावर आम्ही जास्त काही बोलणार नाही, असे विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
'महागाई विरोधात मोर्चा' -वाढत्या महागाई बाबात बोलताना विद्या चव्हाण यांनी म्हटलं की, केंद्र सरकार आणि महागाईविरोधात लवकरच मोर्चा काढणार आहे. तसेच, भाजपा महागाई व बेरोजगारी या विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका करते. मात्र, त्याकडे आता मी लक्ष देणार नाही महाभारतातील अर्जुनचे लक्ष जसे माशाचा डोळा होता, तसा आमचे लक्ष हे महागाई कमी करणे आहे. नरेंद्र मोदी यांनी गॅसचे व पेट्रोलचे दर कमी करतो, असे म्हटले होते. पण, सध्या पाहायला गेले तर एक हजार रुपयांच्या वर गॅसचे दर गेले आहेत. जेव्हा घरात गॅस संपतो तेव्हा रॉकेल ही नसते. आमच्या सरकारच्या काळात रेशन दुकानात रॉकेल देत होतो. परंतु, आता तेही मिळत नाही. यामुळे घर चालवायचे कसे हा मोठा प्रश्न महिलांना पडला असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Vidhan Parishad Elections : 'राज्यसभेची परिस्थिती वेगळी, विधान परिषद निवडणुकीत मविआचे सहा उमेदवार जिंकणार'