महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Himalaya Ticket Book : चंद्रकांत पाटलांंना हिमालयात जाण्यासाठी राष्ट्रवादीकडून रेल्वेचे तिकीट बूक; थ्री टायर एसी अन् जेवणाचाही खर्च - राज राजापूरकर चंद्रकांत पाटलांसाठी तिकीट बूक

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur North Bypoll Result) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav Win) यांचा विजय झाला. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊन हिमालयात जाऊ असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Himalaya Statement) यांनी केले होते. आजच्या निकालात भाजपचा पराभव झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट रेल्वेचे थ्री टायर एसीचे तिकीटच बूक (Himalaya Ticket Book) केले आहे.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील यांना रेल्वे तिकीट बुक

By

Published : Apr 16, 2022, 5:37 PM IST

Updated : Apr 16, 2022, 7:44 PM IST

मुंबई/कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur North Bypoll Result) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav Win) यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊन हिमालयात जाऊ असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Himalaya Statement) यांनी केले होते. आजच्या निकालात भाजपचा पराभव झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट रेल्वेचे थ्री टायर एसीचे तिकीटच बूक (Himalaya Ticket Book) केले आहे.

राष्ट्रवादी नेते राज राजापूरकर यांच्याकडून तिकीट बूक - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आता हिमालयात जावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज राजापूरकर यांनी तिकीट बूक केले आहे. राष्ट्रवादीकडून हे तिकीट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी नेते राज राजापूरकर

हेही वाचा -Kolhapur North By Election Result : चंद्रकांत पाटील यांना आता पश्चात्ताप होत असेल; विजयानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया

देहरादून एक्सप्रेसने हरिद्वारपर्यंतचे तिकीट बुक - चंद्रकात पाटील यांच्यासाठी 20 एप्रिलच्या देहरादून एक्सप्रेसने हरिद्वारपर्यंतचे थ्री टायर एसी तिकीट बुक करण्यात आले आहे. या प्रवासात त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली असल्याचे राज राजापूरकर यांनी सांगितले आहे. तसेच हरिद्वारपासून हिमालयापर्यंत जाण्यासाठी घोडा किंवा खच्चरचा वापर चंद्रकांत पाटील यांनी करावा, असा सल्लाही राज राजापूरकर यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात या विषयाची चर्चा सध्या सुरू आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा टोमणा - या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे. आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हारलो तर हिमालयात जाईल या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. आव्हाडांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून, त्यांचे हात घुडघ्यावर ठेवत ध्यान मुद्रेत डोळे मिटून बसल्याचे दिसत आहे. तो फोटो एडीट करून त्यांच्या मागे हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'मी पोहोचलो रे हिमालयात’ असे वाक्य लिहिले आहे. याखाली दुसरं ट्विट करत “नको, परत या”, असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

हेही वाचा -MVA Celebration Kolhapur : कोल्हापुरात 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' गाणं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जल्लोष

Last Updated : Apr 16, 2022, 7:44 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details