कोल्हापूर- भाजप हे आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ तोंडासमोर आरक्षणाबाबत ते बोलत असतात. मात्र, भाजपच्या मनात आरक्षणाला विरोध आहे. केंद्रातील भाजप शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( NCP state president Nana Patole ) यांनी केला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या प्रचारासाठी ( Kolhapur North elections ) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ( Nana Patole Kolhapur Visit ) शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मोत्सवाचे ( birth anniversary of Rajarshi Shahu ) दर्शन घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सुरुवात केली. अशा या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावी, अशी ( national monument in Kolhapur ) भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी भाजपवरदेखील ( Nana Patole slammed Modi gov ) निशाणा साधला आहे. केंद्र सरकारमुळेच देशात प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे. भाजप देशाचा सत्यानाश करत आहे. मात्र कोल्हापूरमधूनच भाजपच्या पतनाची सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आरक्षण मोडीत काढण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न- छत्रपती शाहू महाराजांचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानमध्ये आरक्षणाची व्यवस्था केली. यामुळे शोषित पीडित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. मात्र, केंद्रातील भाजप सरकार हे आरक्षण मोडीत काढण्याच्या आणि समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करत असल्याचे नाना पाटोले यांनी म्हटले आहे.