कोल्हापूर - कुरुंदवाड पालिकेपासून काही अंतरावर पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर मंगळवारी सकाळी खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाकाळात या घटनेने शहरात खळबळ माजली असून प्रथमदर्शनी अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
कुरुंदवाडच्या माजी उपनगराध्यक्षावर खुनी हल्ला - कुरुंदवाडच्या कुरुंदवाडच्या माजी उपनगराध्यक्षावर हल्ला
कुरुंदवाडच्या माजी उपनगराध्यक्षावर खुनी हल्ला झाला. या घटनेत ते जखमी झाल्याचे समजते आहे.
![कुरुंदवाडच्या माजी उपनगराध्यक्षावर खुनी हल्ला Murderous attack on former Deputy Mayor of Kurundwad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11924334-976-11924334-1622134395226.jpg)
अज्ञात व्यक्तीने केला हल्ला -
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील हे सकाळी गणेश बँकेनजीक आले होते. अचानक अज्ञात व्यक्तीसोबत वादावादी सुरू झाली. त्याचदरम्यान जवाहर पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला प्रतिकार केल्याने किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अचानक हल्ल्याची घटना घडल्याने बघ्यांची गर्दी झाली. हल्लेखोर पसार झाले असून यावेळी जखमी झालेल्या जवाहर याना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जवाहर पाटील यांच्यावर भरवस्तीत हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.