कोल्हापूर - महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज (बुधवारी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहराचा महत्त्वाचा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजारामपुरी परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा ( Municipal Corporation action on encroachment Kolhapur ) हातोडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजारामपुरी परिसरात पार्किंगची ( Parking problem in Rajarampuri area ) व्यवस्था बिकट झाली होती. या कारणाने गाड्या रस्त्यावर पार्क करण्यात येते होते. यामुळे ट्रॅफिकचा प्रश्नही निर्माण झाला होता. हीच समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने ही कारवाई केली असून पुढील 2 दिवस अशीच कारवाई सुरू राहणार आहे. शिवाय अन्य ठिकाणी सुद्धा जेथे अडथळा निर्माण होईल तेथे महापालिकेचा हातोडा पडणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाची बाजारपेठ मात्र पार्किंगची समस्या मोठी :राजारामपुरी बाजारपेठही शहरातली सर्वात पॉश आणि मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नामवंत कंपन्यांचे शोरूम देखील आहेत. रोज लाखोंची उलाढाल या बाजारपेठत होत असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. काही दुकानदारांनी जागेत अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या वाहने रस्त्यावरच पार्क करत असत. यामुळे वाहतुकीची ही मोठी कोंडी येथे निर्माण होत असते. महापालिकेने यापूर्वी 2 वेळा संबधित दुकानदारास अतिक्रमण काढण्यास नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र स्वतः हून अतिक्रमण न काढल्याने आज महापालिकेने धडक कारवाई केली आहे. यामुळे राजारामपुरी परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीस येणारे अडथळे कमी होताना दिसत आहेत.