ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..म्हणून संभाजीराजेंनी महापालिका सभा तहकूब केल्यानंतर व्यक्त केली नाराजी - कोल्हापूर पालिका सभा तहकूब

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु, मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे, असे संभाजी राजे म्हणाले.

संभाजी राजे
संभाजी राजे
author img

By

Published : Sep 25, 2020, 9:50 PM IST

कोल्हापूर - महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब केल्याबद्दल सर्वांचे आभार. मात्र, मोदींनी भेट नाकारल्यामुळे सभा तहकूब केली या उल्लेखावर खासदार संभाजीराजेंनी आक्षेप नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे हे म्हणजे केवळ राजकारण आहे. मी ठरवले तर मोदींना कधीही भेटू शकतो, मात्र मला एकट्याला भेटायचे नाही तर सर्व मराठा खासदारांना एकत्र घेऊन भेटायचे आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. शिवाय मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय असल्याचे सुद्धा संभाजीराजेंनी पत्रकाद्वारे नमूद केले.

in article image
निवेदन

मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. हे ऐकल्यावर आश्चर्य वाटले. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु, मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे. गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. तुमचे माझ्या विषयीचे प्रेम समजू शकतो, पण.. गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात ही योजना मैलाचा दगड ठरेल.

हेही वाचा -एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध?

आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणे आवश्यक होते. तसेच, कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता असे म्हणत संभाजीराजेंनी आपली पत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details