कोल्हापूर- सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे उद्घाटन आज कोल्हापुरात होत आहे. त्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी शाहू समाधीस्थळावर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. समतेची शिकवण दिलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचा विचाराचा जागर असाच अखंड चालू दे, अशी प्रतिक्रियाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
आज कोल्हापुरात सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार - लोकराजा राजर्षी शाहू महाराज
सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे उद्घाटन आज कोल्हापुरात होत आहे. त्या निमित्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी शाहू समाधीस्थळावर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. समतेची शिकवण दिलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचा विचाराचा जागर असाच अखंड चालू दे, अशी प्रतिक्रियाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थिती लावली होती. पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समाजाला आधार देण्याचे काम सारथी संस्था करते. या संस्थेचा आधार मराठा समाजातील तरुणांना आहे, म्हणूनच मूक आंदोलन करताना मी सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी केली होती. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्याचे ठरवले, याचा मला आनंद वाटतो. सारथी संस्थेच्या उपकेंद्रासाठी राज्य सरकारने दोन एकर जागा दिली आहे, या निर्णयासाठी मी दोघांचेही कौतुक करतो. मात्र ही जागा वाढवून पाच एकर द्यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केली आहे.