महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मराठा समाजावर अन्याय झाला, यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका' - maratha reservation update

मराठा समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून विद्यमान सरकार किंवा मागचे सरकार दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

MP Sambhaji Chhatrapati
खासदार संभाजीराजे छत्रपती

By

Published : Sep 9, 2020, 7:50 PM IST

कोल्हापूर - मराठा समाजावर आज अन्याय झाला आहे. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मात्र, आता यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. शिवाय समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून विद्यमान सरकार किंवा मागचे सरकार दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असेही संभाजीराजेंनी म्हंटले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली असून, प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.

मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीने सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details